विखे पिता-पुत्रांवर कारवाई??; राम शिंदे म्हणतात…

मुंबई | भाजप नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ‘पाडापाडी’चा आरोप असलेल्या विखे पिता-पुत्रावर कारवाई होणार का?, याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. यावर विजय पुराणिक समिती यासंबंधी अहवाल सादर करणार असून त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती माजी मंत्री राम शिंदे यांनी यांनी दिली आहे.

पक्षाला आम्ही आमच्या व्यथा आणि अनुभव सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या गेल्या. विजय पुराणिक यासंबंधी अहवाल सादर करणार आहेत, त्यानंतर पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पक्षाच्या निर्णयामुळे समाधान मिळाल्याचं, राम शिंदेनी सांगितलं आहे.

सकारात्मक चर्चा झाली असून अंतर्गत निर्णय जाहीर करायचे नसतात, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीनंतर दिली. या बैठकीला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे आणि अहमदनगरमधील भाजप नेते उपस्थित होते.

दरम्यान, नाराजी वरिष्ठांकडे मांडायला हवी होती, मीडियासमोर नाही, असं म्हणत भाजपवासी झालेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली तक्रार करणाऱ्या भाजप नेत्यांना बैठकीपूर्वी टोला लगावला होता.

महत्वाच्या बातम्या-