चुका दाखवत रामदास आठवलेंनी शशी थरूर यांना दिले इंग्रजीचे धडे, म्हणाले…

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यावेळी अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या.

या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, आरोग्य व्यवस्था यांसाख्या अनेक क्षेत्रांना मोठ्या घोषणा केल्या. त्यानंतर आता काँग्रेसने या अर्थसंकल्पावर टीका देखील केली आहे.

अशातच आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अनोख्या पद्धतीने अर्थसंकल्पावर टीका केली आहे. शशी थरूर यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केलाय.

शशी थरूर यांनी शेअर केलेल्या या फोटोत निर्मला सितारमण बजेट सादर करताना दिसत आहेत. त्यात भाजप खासदार राजवर्धन राठोर, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले दिसत आहेत.

शशी थरूर यांनी रामदास कदम यांचा वाकुल्या दाखवल्याचा फोटो शेअर केला आणि त्यावर मिश्किल टिपण्णी देखील केलीये. त्यावर आता ट्विटरवर जोरदार चर्चा रंगली आहे.

जवळजवळ दोन तास बजेट ऐकल्यानंतर रामदास आठवले यांचा स्तब्ध आणि अविश्वसनीय चेहरा सगळं सांगतोय, असं शशी थरूर म्हणाले आहेत.

अर्थमंत्र्यांनी बजेटवर केलेले दावे आणि घोषणा यावर ट्रेझरी बेंच देखील विश्वास ठेवू शकत नाहीत, असं म्हणत शरूर यांनी टोमणे मारेल. त्यावर रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अनावश्यक दावे आणि वक्तव्य करताना चुका होणारच, असं म्हणत त्यांनी इंग्रजीच्या चुका दाखवून दिल्या आहेत. Bydget नाही तर BUDGET आणि rely नाही तर reply, असं म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, ट्विटरवर सध्या शशी थरूर यांच्या ट्विटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

पाहा ट्विट-


महत्त्वाच्या बातम्या – 

“केंद्राची सुरक्षा असतानाही सोमय्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला”

“आले रे आले मराठे आले…”; बहुप्रतिक्षित ‘पावनखिंड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

ओवेसींनी पाकड्यांना सुनावलं म्हणाले, “हा देश माझा आहे, तुमच्या…”

 “हा पुरूषार्थ आहे का?”; हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

 मनसेचं ठरलंय! “आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनणार”