“बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आज सत्तेत बसलेत”

मुंबई | 2019 साली देशाच्या राजकारणात मोठी ऐतिहासिक राजकीय घटना घडली होती. शिवसेनेच्या एका निर्णयानं महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर सारत शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाला गवसणी घातली होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सत्ता हाकत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रयोगानं देशात भाजप विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या जोरदार वाद रंगला आहे. मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना पत्र लिहून मोठे गौप्यस्फोट केले होते. राज्यातील सत्ता पाडण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जात असल्याचं राऊत म्हणाले होते.

ईडीनं संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केल्यानंतर राज्यासह देशात वातावरण तापलं होतं. अशात आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील अनेक चौकशींना सामोरं जावं लागलं होतं. तुम्ही स्वत:ला वाघोबा समजता मग चौकशीला कसले घाबरता?, असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे हे सत्तेत बसलेत. यापेक्षा दुसरं मोठं दुर्देव काय असू शकतं, या शब्दात मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर आपल्या खास शैलीत टीका केली आहे. राज्यात काहीच काम केली जात नाहीत. चौकशीमुळं कोणतंही सरकार अस्थिर होत नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.

दरम्यान, ईडीच्या सततच्या कारवाईवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप सरकार गैरवापर करत असल्याची टीका विरोधक करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“आले रे आले मराठे आले…”; बहुप्रतिक्षित ‘पावनखिंड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

ओवेसींनी पाकड्यांना सुनावलं म्हणाले, “हा देश माझा आहे, तुमच्या…”

 “हा पुरूषार्थ आहे का?”; हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

 मनसेचं ठरलंय! “आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनणार”

“कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण…”; भारतीयांना अत्यंत धक्कादायक इशारा जारी