चंद्रकांत पाटलांच्या एक पाऊल पुढे रामदास आठवले; म्हणतात…

मुंबई |  गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ‘अब की बार 220 पार’चा नारा देत आहेत. आजही निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच चंद्रकांत पाटील यांनी 220 च्या पुढे जाऊ मात्र खाली येणार नाही, असं म्हटलं. मात्र केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाटलांच्या एक पाऊल पुढे टाकलं आहे. महायुतीला 240 ते 250 जागा नक्की मिळतील, असं म्हटलं आहे.

भाजप आणि शिवसेनेनं छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद न करता एकत्रपणे निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, असं मतंही त्यांनी व्यक्त केलं.

शिवसेना-भाजपने 18 जागा मित्रपक्षाला सोडल्या आहेत. त्यापैकी 10 जागांवर आरपीआय लढणार असल्याचा दावा आठवले यांनी केला.

राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार आल्यानंतर आरपीआयला एक कॅबीनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, अशी मागणीही यावेळी आठवलेंनी केली.

दरम्यान, महाराष्ट्रात भाजप सरकारने जो विकासाचा झंझावात केला त्याला तोड नाही. त्याचच फळ जनता मतरूपी आशीर्वादाने देणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-