…अन् शरद पवारांनी तात्काळ विश्रामगृह सोडलं!

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी सकाळी नगरमध्ये दाखल झाले होते. पवार हे नगर-औरंगाबाद रोडवरील विश्रामगृहात थांबले होते. दुपारी 12 वाजता निवडणुकीची आचारसंहिता लागताच शरद पवारांनी तातडीने विश्रामगृह सोडलं.

शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी शरद पवार सकाळीच नगरमध्ये दाखल झाले होते. दुपारी निवडणूक आयोगाने निवडणूक तारखा जाहिर केल्यानंतर पवारांनी तातडीने विश्रामगृह सोडलं. यानंतर ते टिळकरोडवरील मंगल कार्यालयात होणाऱ्या सभेसाठी रवाना झाले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. 21 ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान होणार असून मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने आणि हेलिकॉप्टरचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. तसंच सरकारी मालमत्ता, सरकारी गेस्ट हाऊसमध्ये हक्कही गाजवता येत नाही. यामुळे पवारांनी आचारसंहिता लागताच लगोलग विश्रामगृह सोडलं.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. निवडणुकांसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या-