“सत्तेचा उपयोग आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नागरिकांच्या कल्याणासाठी करा”

मुंबई |  महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. राज्य सरकार विनाकारण केंद्र सरकारवर आरोप करत आहे, असं भाजप नेते म्हणत आहेत.

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला गेला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरादार टीका केली होती.

राऊत यांच्या टिकेनंतर भाजपकडून त्यांना उत्तर देण्यात आलं आहे. भाजप-शिवसेना यांच्या वादात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे.

आरोप प्रत्यारोप राजकारणात होत असतात. हे कुठं तरी थांबवलं पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालायला हवं, असं आठवले म्हणालेत.

एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे. सत्तेचा उपयोग आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नागरिकांच्या कल्याणासाठी करणं आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा आणि सरकारचा काही संबंध नाही. सरकार पाडायचं असतं तर आमदारांची चौकशी लावली असती, असं वक्तव्यही रामदास आठवले यांनी केलं आहे.

विरोधी पक्ष म्हणून आरोप केल्यास त्याला भाजपा नेते उत्तर देण्यास खंबीर आहेत. परंतु, हे थांबलं पाहिजे. हा वाद मिटला पाहिजे. एकमेकांची बदनामी करू नये, हे माझं मत आहे, असं आठवले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

“सनम हम तो डुबेंगे, पर तुझे भी लेकर डूबेंगे” 

  मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र, दिल्या ‘या’ सूचना

  ‘चौकशी होणार कळल्यामुळे संजय राऊत सैरभैर झालेत, त्यांना आवरा’

  महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अन् भाजपला शिवसेनेचा जोर का झटका!

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका