मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीने उमेदवार उभा केल्यानेच भाजपने धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. धनंजय महाडिक यांचा विजयही झाला. या निवडणुकीत अपक्षांची मते ही भाजपच्या पारड्यात पडली असून त्यामुळे महाविकास आघाडीचा मोठा अपमान झाला आहे, असं आठवले म्हणालेत.
रविवारी मुक्ताईनगर येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलीये.
दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक असा सामना रंगला होता.
निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचे पारडे जड मानलं जात होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांचे अचूक व्यवस्थापन केल्याने धनंजय महाडिक विजयी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्ज घेताना अटक
तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय ‘इतक्या’ जागा भरणार
“हातात ईडी येण्यासाठी लोकसभेची सत्ता असावी लागते, तुम्हाला तर…”
“महाविकास आघाडीला विधानपरिषद निवडणुकीत मोठं खिंडार पडेल”
15 जूनपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार; हवामान खात्याकडून अलर्ट जारी