महाराष्ट्र मुंबई

भाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले

मुंबई | महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होत आहे. भाजपने आपल्या कोट्यातील एक जागा ‘रिपाइं’ला द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

विधानपरिषदेच्या 9 जागांपैकी चार जागा भाजपला जिंकता येण्याची शक्यता आहे. या चार जागांपैकी एक जागा भाजपने रिपाइंला देऊन सामाजिक समतोल साधावा. या मागणीचे पत्र आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकांच्या वेळी तिकीट नाकारलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विधानपरिषदेसाठी इच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याचं खुद्द खडसेंनी कालच सांगितलं होतं.

दरम्यान, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची नावं चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. आधीच तीन जागांसाठी चार नावं शर्यतीत असताना, आठवलेंच्या पक्षाला संधी मिळणार का, हे पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-UPSC परीक्षेसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय

-“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”

-परदेशातील भारतीयांना विमानातून फुकट आणलं, मग स्थलांतरित कामगारांकडूनच पैसे का?- प्रकाश आंबेडकर

-रिंकू राजगुरुनं शेअर केला हॉट लूक; लाईक करायला उडाली चाहत्यांची झुंबड

-उद्धव ठाकरेंसह शिवसेनेकडून विधानपरिषदेचा दुसरा उमेदवारही निश्चित