“हे सरकार 50 दिवसही टिकणार नाही, सावरकरांच्या मुद्द्यावरून सरकार कोसळेल”

यवतमाळ |  राज्यात महाविकास आघाडीचं सरकार 50 वर्षे राहील, असं मुख्यमंत्री म्हणत असले तरी हे सरकार 50 दिवसही टिकणार नाही. सावरकरांच्या मुद्द्यावरून हे सरकार कोसळेल, अशी शक्यता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

सावरकरांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. हे सरकार या वादामुळे कोसळू शकते, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

सध्याच्या परिस्थितीत सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसचा पाठिंबा शिवसेनेनं घेऊ नये आणि काँग्रेसने सावरकरांवरून त्यांच्या नेत्यावर टीका होत असेल तर सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असंही आठवलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात हे सरकार पडल्यास शिवसेना आणि भाजपने युती करून महाराष्ट्रतील जनतेला स्थिर सरकार द्यावं, शिवसेना येत नसेल तर राष्ट्रवादी आणि भाजपने राज्यात सरकार बनवावं, असा सल्लाही रामदास आठवलेंनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-