होय, जीएसटीमधून मिळणारा महसूल घटला- निर्मला सीतारामन

नवी दिल्ली |18डिसेंबरला जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यांचे अर्थमत्री महसुली उत्पन्नाच्या वाट्यावरुन केंद्राला धारेवर धरण्याची शक्यता असल्यानं मोदी सरकारनं राज्यांना त्यांचा वाटा दिला.

जीएसटी महसूल वाढवण्यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत काम करत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. दोन प्रमुख कारणांमुळे महसुल उत्पन्न घटलं. पुराचा फटका बसलेल्या राज्यांना जीएसटी भरण्यास अधिकचा कालावधी देण्यात आला आहे. तर काही क्षेत्रांमधील उत्पादनांना फारशी मागणी नाही, असं सीतारामन यांनी सांगितलं.

जीएसटीमधून होणारा महसूल घटत असल्यानं मोदी सरकार जीएसटीचे दर वाढवणार असल्याची चर्चा अर्थ वर्तुळात आहे. त्यावरदेखील सीतारामन यांनी खुलासा केला.

जीएसटीचा दर वाढवण्याची चर्चा माझं कार्यालय सोडून सगळ्याच ठिकाणी असल्याचं म्हणत सीतारामन यांनी जीएसटी दरातील वाढीची शक्यता फेटाळून लावली. मात्र जीएसटीमधून झालेली वसुली अपेक्षेपेक्षा कमी असल्याची कबुली सीतारामन यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-