“2 पेक्षा अधिक मुलं जन्माला घातली ना…. त्यांचा मतदानाचा अधिकारच काढून घ्या”

पाटणा | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करण्याची गरज व्यक्त केली होती. यातच योगगुरु रामदेव बाबा यांनी तिसरं मुल जन्माला घातलं तर नागरिकांचा मताधिकारच काढा, असं मत व्यक्त केलं आहे.

‘बिझनेस टाॅक शो’ या कार्यक्रमात रामदेव बाबा बोलत होते. लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. दोन पेक्षा अधिक मुल जन्माला घालणाऱ्यांचा मताधिकार काढला पाहिजे, तसेच चौथे मुल जन्माला घातले तर त्या मुलाचाही मताधिकार काढायला हवं, असं ते म्हणाले आहेत.

मुल जन्माला घालण्याचं सर्वांना स्वातंत्र्य आहे, पण लोकसख्या मर्यादेपेक्षा अधिक वाढता कामा नये. कारण वाढती लोकसंख्या ओझे बनते. तसेच देशातील साधनसंपत्तीवर ताण पडतो, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, भारताची लोकसंख्या 135 कोटींपर्यंत पोहोचली आहे. लवकरच भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसंख्या नियत्रंणासाठी कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुस्लिमांना पाकिस्तान, बांगलादेशातून पैसा मिळत असेल तर…- भाजप आमदार

-आता हे अति होतंय… लवकरात लवकर कारवाई करा; संभाजीराजे संतापले

-“शिवरायांचा राजकारणासाठी वापर करणं चुकीचं, अपमान सहन केला जाणार नाही”

-“मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेनं जे केलं ते खुलेआम केलं”

-काय करावं आता… वर्गशिक्षिकाच आठवीच्या मुलासोबत गेली घरातून पळून!!!