केवळ अफलातून! गणेश मंडळाचा अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा प्रवास

मुंबई | आपल्या दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या बैठकीवर शिवसेना आमदार रमेश लाटके यांनी आपली राजकीय कारकिर्द मोठी केली.

रमेश लटके यांनी गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला. तेव्हापासून अंधेरी भागात त्यांची लोकप्रियता वाढत गेली.

शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रभावीत झालेले रमेश लटके हे कट्टर शिवसैनिक होते. 1997 ते 2012 असं सलग तीनवेळा लटकेंनी नगरसेवक पद भुषवलं आहे.

अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे लटके हे शिवसेनेचे मातब्बर नेते मानले जात होते. त्यांनी अंधेरी पुर्वमधून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला होता.

भाजप उमेदवार सुनिल यादव यांचा पराभव करून लटकेंनी पहिल्यांदा 2014 मध्ये विधानसभेत प्रवेश केला होता. अंधेरी भागातील नागरिक लटकेंवर प्रचंड विश्वास दाखवत होते.

अंधेरी भागात शिवसेना वाढवण्यात लटकेंनी मोठी भूमिका निभावली होती. लटके हे शिवसेनेतील मातब्बर नेते मानले जाऊ लागले होते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या कार्यक्रमाला शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि अनिल परब हे उपस्थित होते. अशात त्यांच्या जाण्यानं शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सदावर्ते निघाले अयोध्येला! अयोध्येतील साधु-संतांनी आमंत्रण दिल्याचा दावा

 “घोटाळेबाजांवर आता अंतिम कारवाई”; सोमय्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

 “राज साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही”

सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित 

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर