लोकशाहीत सत्ताधारी-विरोधक दोघांची भूमिका महत्वाची- रामनाथ कोविंद

नवी दिल्ली | लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक दोघांची भूमिका महत्वाची असते, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी केलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला कोविंद यांनी देशाला संबोधित केले.

राष्ट्रपतींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनी मिळून देशाच्या विकासासाठी काम करावं, असं आवाहनही केलं. राजकीय मतभेद असू शकतात, पण राष्ट्राच्या विकासासाठी एकजुटीने पुढे जायला हवं, असंही कोविंद म्हणाले आहेत.

राष्ट्रपतींनी यावेळी तरुणांनाही संदेश दिला आहे. देशातील तरुणांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे, मात्र त्यांनी अहिंसक मार्ग अवलंबवला पाहिजे. महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे, असंही रामनाथ कोविंद म्हणाले आहेत.

संविधानाने आपल्याला लोकशाहीचे अधिकार दिले आहेत. मात्र, आपले काही कर्तव्यही आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या लोकशाही मुल्यांविषयी आपण नेहमी कटीबद्ध असायला हवं, असं राष्ट्रपती म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“उद्धव आणि संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालंय”

-यांच्या देशभक्तीला सलाम.. हिमवीरांनी बर्फात फडकवला तिरंगा

-“जयंत पाटलांचा आंबेडकरांवरील आरोप म्हणजे निव्वळ बालिशपणा”

-आज मी जो काही आहे तो बाळासाहेबांमुळेच- नारायण राणे

-“उद्धवजी, लेकाचे हट्ट पुरवण्याऐवजी राज्यातील इतर प्रश्न सोडवा”