“उद्धव आणि संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालंय”

मुंबई | 23 जानेवारीला मुंबईत शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने मंचावर शिवसेनेची फिरकी घेतली होती. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी त्या प्रसंगाचा व्हिडीओ शेअर करत शिवसेनेला ट्रोल केलं आहे.

व्हिडीओमध्ये कलाकार निलेश साबळे पालक तर श्रेया बुगडे शिक्षिकेच्या भूमिकेत आहेत. यात निलेश साबळेचा मुलगा नापास झाला असतो. तरीही साबळे पेढे वाटत असतो. यावर शिक्षिका त्याला विचारते. अहो तुमचा मुलगा नापास झाला आहे, तरी तुम्ही पेढे का वाटत आहात.निलेश साबळे यावर भन्नाट उत्तर देतो.

अहो, वर्गातील 70 टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे माझा मुलगा बहुमताच्या बाजूने आहे. येथे लोकशाही आहे त्यामुळे तुम्ही काहीही बोलू शकत नाही, असं साबळे म्हणतो. राणेंनी हा व्हिडीओ शेअर करत उद्धव आणि संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं, अशी बोचरी टीका केली आहे.

दरम्यान, भाजपनेही आपल्या अधिकृत ट्विटर पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करत शिवसेनेवर टीका केली होती.

 

महत्वाच्या बातम्या- 

-यांच्या देशभक्तीला सलाम.. हिमवीरांनी बर्फात फडकवला तिरंगा

-“जयंत पाटलांचा आंबेडकरांवरील आरोप म्हणजे निव्वळ बालिशपणा”

-आज मी जो काही आहे तो बाळासाहेबांमुळेच- नारायण राणे

-“उद्धवजी, लेकाचे हट्ट पुरवण्याऐवजी राज्यातील इतर प्रश्न सोडवा”

-सत्काराचे पैसे वळसे पाटील करतात रूग्णांवर खर्च; समाजापुढे ठेवला एक नवा आदर्श