मोठी बातमी! राणा दाम्पत्याला न्यायालयाचा झटका, जेलमधील मुक्काम वाढला

मुंबई | मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला मोठा झटका दिला आहे. आज राणा दाम्पत्याकडून मुंबईतील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला.

या अर्जावर सुनावणी सुरू असताना राणा दाम्पत्याचे वकील अ‍ॅड रिझवान मर्चंट यांनी जामीन देण्याची मागणी केली.

सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीनाला विरोध केला. आधी मॅजिस्ट्रेट कोर्टातून अर्ज मागे घ्यावा नंतर सुनावणी करावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

वांद्रे न्यायालयातील जामीन अर्ज मागे घ्यावा लागेल तरच सत्र न्यायालयात सुनावणी होईल. दरम्यान आम्ही वांद्रे न्यायालयातील अर्ज मागे घेत आहेत असं राणा दाम्पत्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी कोर्टात स्पष्ट केलं आहे.

आता 29 एप्रिलपर्यंत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कारागृहातच रहावे लागणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, याआधी मुंबई उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळल्याने राणा पती-पत्नीचा तुरुंगातील मुक्काम वाढणार आहे.

न्यायालयाने सुनावणी दरम्यान राणा दांपत्याला फटकारलं आहे. दुसऱ्या प्रकरणात अटक केली जाणार असल्यास 72 तासांची नोटीस द्यावी असं न्यायालयाने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

भर मांडवात नवरा बायकोची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ 

‘….हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही’; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका 

मोठी बातमी! राज ठाकरेंना झटका, सभेपूर्वी पोलिसांनी उचललं मोठं पाऊल 

“माझ्यावर टीका करणाऱ्या अनेकांना मी खिशात घेऊन फिरतो” 

अखेर Elon Musk यांनी विकत घेतलं ट्विटर, मोजले ‘इतके’ पैसे