राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार, शिवसेना व्हिडीओ बाॅम्ब फोडणार; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

मुंबई | आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत राणा दाम्पत्यांना आंदोलन मागे घेण्यास भाग पाडलं.

अशातच आता राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार कृपाल तुमाणे यांनी आज दुपारी 3 वाजता राणा दाम्पत्याबाबत मोठा व्हिडिओ बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

पत्रकार परिषद घेत कृपाल तुमाणे यांनी ही माहिती दिली. आज दुपारी तीन वाजता मुंबई पोलिसांसमोर काही व्हि़डीओ ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

जर तुम्ही देवाचा गैरवापर करू लागले. जर देवाबद्दल जर खोटं बोलले तर असा बक्षिस मिळेलच आणि तो हनुमानजी ने दिलाच आहे, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान,  राणा दाम्पत्यांनी मुंबई पोलिसांवर अपमानास्पद वागणू क दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे आता मोठा वाद रंगण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक, त्याचं प्रायश्चित्त आम्ही भोगतोय”

चिंताजनक ! कोरोनाच्या ‘या’ नव्या लक्षणानं वाढवलं टेंशन

 “महाराष्ट्रात योगी कुणीच नाही आहेत ते फक्त सत्तेचे भोगी” 

  ‘शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून…’; पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल

  मोठी बातमी ! ट्विटरनंतर आता Elon Musk खरेदी करणार ‘ही’ कंपनी, पाहा ट्विट