मॅक्सवेलच्या लग्नाची पार्टी! विराट अॅड कंपनीने लगावले ठुमके; पाहा व्हिडीओ

मुंबई | आयपीएलचे मागील दोन हंगाम कोरोनामुळे अडचणीत आले होते. त्यामुळे सर्वच खेळाडूंना बायोबबलमध्ये रहावं लागलं होतं. अशातच आता कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याने खेळाडूंना सामना झाल्यावर फिरता येत आहे.

काही दिवसांपूर्वी चेन्नई संघाचा कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सर्व खेळाडू पारंपरिक ड्रेस असलेल्या लुंगीमध्ये दिसले. त्यावेळी चेन्नईचे खेळाडू लुंगी डान्स करताना दिसले.

अशातच आता ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू आणि आरसीबी संघाचा बॅकबोन असलेल्या मॅक्सवेलने आपल्या सवंगड्यांना शानदार पार्टी दिली आहे. नुकतंच मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमण हिच्याशी लग्नगाठ बांधली.

त्यानंतर आता त्याने आरसीबी संघासाठी खास पार्टीचं आयोजन केलं. त्यावेळी विराट अॅड कंपनीने म्हणजेच आरसीबीच्या खेळाडूंनी डान्स करत ठुमके लगावल्याचं पहायला मिळालं आहे.

त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जातोय. त्यामुळे विराटसोबत अनुष्का देखील दिसली. त्याचबरोबर खेळाडूंच्या पत्नी देखील पार्टीसाठी आल्या होत्या.

दरम्यान, विराट कोहलीने यावेळी शाहबाज अहमद याच्यासोबत केलेला डान्स तुफान व्हायरल होत आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

पाहा फोटो आणि व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या – 

राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार, शिवसेना व्हिडीओ बाॅम्ब फोडणार; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

“राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक, त्याचं प्रायश्चित्त आम्ही भोगतोय”

चिंताजनक ! कोरोनाच्या ‘या’ नव्या लक्षणानं वाढवलं टेंशन

 “महाराष्ट्रात योगी कुणीच नाही आहेत ते फक्त सत्तेचे भोगी” 

  ‘शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून…’; पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल