बाळासाहेब ठाकरे हाजी मस्तानचे चांगले मित्र होते; डाॅनच्या पुत्राचा दावा

मुंबई | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांची भेट घेतली होती, असा गौप्यस्फोट शिनसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावर बोलताना अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान याचा दत्तकपुत्र सुंदर शेख यांनी मोठा खुलासा केला आहे.

इंदिरा गांधी आणि करील लाला यांच्या भेटीच्या वृत्ताला सुंदर शेख यांनी दुजोरा दिला आहे. तसेच अंडरवर्ल्ड डाॅन हाजी मस्तान हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले मित्र होते, असा दावाही सुंदर शेख यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.  संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाचा नाराजीचा सूर पाहून आपलं वक्तव्य मागे घेतलं.  कुणी दुखावलं गेलं असलं, तर हे वक्तव्य मी मागं घेत आहे, असं राऊत यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करत भविष्यात अशी वक्तव्य खपवून न घेण्याचा इशारा दिला. तर आदित्य ठाकरे यांनी याची पुनरावृत्ती कोणत्याही शिवसैनिकाकडून होणार नाही याची ग्वाही दिली.

महत्त्वाच्या बातम्या –