रोहित पवारांनी लावला थेट मोदींना फोन; म्हणाले, ‘मेरा नाम तो आपने सुना ही होगा…!’

अहमदनगर |  संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावतीने मेधा युवा सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राज्यातल्या तरुण आमदारांसोबत संवाद होत आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार आदिती तटकरे, काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी यांनी एकाच मंचावर हजेरी लावली आहे.

गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते हे तरूण आमदारांशी संवाद साधत आहेत. मुलाखतीच्या दरम्यान  त्यांनी आपल्या आवडत्या व्यक्तीला फोन लावण्याचा खेळ घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन लावला. आणि लावल्याबरोबर माझं नाव रोहित पवार…. माझं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल…. असं म्हणत त्यांनी मोदींना बोलायला सुरूवात केली.

नमस्कार मोदीसाहाब… मी रोहित पवार बोलतोय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. सरकार चांगलं काम देखील करत आहे. गेली 5 वर्ष विकास झाला नव्हता… तो नक्की आता होईल, एवढं आश्वासन देतो. तरूणांच्या हाताला काम कसं मिळेल याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. तसंच केंद्राचं औद्योगिक धोरणं आपल्याला काही प्रमाणात बदलावं लागेल… ते बदलावं अशी आपल्याला विनंती करतो, असं रोहित म्हणाले.

मोदी साहेब चारच वर्ष राहिलीत आता तुमची… चांगलं लक्ष द्या आणि देशाची काळजी घ्या…. देशाच्या जनतेची काळजी घ्या……, असा टोमणा मारत तुम्ही  खूप व्यस्त असाल… माझं बोलणं मी आवरतं घेतो, असं म्हणत त्यांनी फोन कट केला.

महत्वाच्या बातम्या-