“तुम्ही नरेंद्र मोदींचा छळ केला तेंव्हा आम्ही असेच आरोप केले का?”

मुंबई | मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली असून कोर्टात हजर केले असता 7 दिवसापर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) नेते आणि मंत्र्यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे.

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई का होत नाही?, असा सवाल केला जात आहे. यालाच भाजप नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे.

अमित शहांना (Amit Shah) जेलमध्ये टाकलं, नरेंद्र मोदींचा छळ केला तेंव्हा आम्ही असेच आरोप केले का? असा उलट सवाल भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला.

रावसाहेब दानवे शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरून दानवेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

भाजपच्या लोकांना ईडीचा आणि सीबीआय त्रास झाला नाही असे तुमचा आरोप आहे? नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआयकडून त्यांचा किती छळ झाला याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना नाही का?, असा सवाल रावसाहेब दानवेंनी केला आहे

अमित शहांना जेलमध्ये टाकलं, नरेंद्र मोदींचा छळ केला तेंव्हा आम्ही असेच आरोप केले का? सीबीआय चौकशी झाल्यानंतर नरेंद्र मोदी जेंव्हा बाहेर आले तेंव्हा पत्रकारांना फक्त फक्त नमस्कार करून निघून गेले. मात्र नवाब मलिकला ईडीला पकडल्यानंतर त्यांनी फारच बहाद्दुरकी केल्यासारखा हात वर करून जल्लोष केला. ही काय वागण्याची पद्धत झाली का?, असंही दानवे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

“…त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री अजून किती दिवस हे सहन करायचं” 

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेणार 

“अजूनही वेळ गेली नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचार करावा” 

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?- भगतसिंह कोश्यारी