संतापजनक! 11 महिने अल्पवयीन मुलीसोबत जे केलं ते ऐकून काळजाचा थरकाप होईल!

उज्जैन | पोलिसांना कायद्याचे रक्षक मानलं जातं. मात्र, मध्य प्रदेश मधील उज्जैन शहरामधून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस उपनिरीक्षक तब्बल 11 महिने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत असल्याची घटना येथे घडली आहे.

माहीतीनुसार, एक 17 वर्षीय तरुणी उपनिरीक्षक पंकज जैन यांच्या घरी घरकाम करत होती. याचाच फायदा घेत या पोलिसाने तब्बल 11 महिने तिच्यावर घरी तसेच हॉटेलमध्ये बलात्कार केला. त्याबरोबरच, पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवून वारंवार तिला धमकावत शरीरभोगाची मागणी केली, असा आरोप पीडीतेने केला आहे.

याप्रकरणी, पीडित तरुणीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी एक सापळा रचला. उपनिरीक्षक पंकज जैन यांनी या तरुणीला मंगळवारी हॉटेलमध्ये बोलावलं होतं. याबाबत तरुणीने निलगंगा पोलिसांना अगोदरच माहिती दिली होती.

मंगळवारी निलगंगा पोलिसांनी हॉटेलवर जाऊन आरोपीला रंगेहात पकडलं आहे. आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती केलं होतं तरुणाला; त्यानं उचललेल्या पावलानं प्रशासन हादरलं!

“साहेब मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, तर पावसात भिजूनही पंतप्रधान होता येणार नाही”

धक्कादायक! मोठ्या भावाने समोसा खाल्ला म्हणून लहान भावाने उचलले ‘हे’ पाऊल

तैमूर आणि करिनासोबत फिरताना सैफनं घातला नाही मास्क; ट्रोल झाल्यावर दिलं ‘हे’ कारण

महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावण्याचे प्रयत्न; ‘या’ महिन्यात होणार सत्तापालट?