संजय राऊत म्हणतात,”चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ, त्यांच्या चष्म्याचा नंबर…”

मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद पेटला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्याच्या कारणानं ते सध्या सार्वजनिक कार्यक्रमापासून लांब रहात आहेत, परिणामी पाटील यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

केंद्र सरकारच्या आवाहनाला ठाकरे सरकार व्यवस्थित प्रतिसाद देत नाही, अशी टीका पाटील यांनी केली होती. त्यानंतर राऊत यांनी पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

देशात सध्या महाराष्ट्र हे एकमेव व्यवस्थित काम करणार राज्य आहे. चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागणार आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डाॅक्टर लहाने यांच्या नेतृत्वाखाली एक पथक भाजपच्या कार्यालयात पाठवता येईल का याचा विचार करावा लागेल, असंही राऊत म्हणाले आहेत.

सध्या देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. शिवसेनेनं उत्तर प्रदेश आणि गोवा राज्यात उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाही केला आहे. परिणामी भाजप आणि शिवसेनेत वाद वाढला आहे.

चंद्रकांत पाटील हे सज्जन ग्रहस्थ आहेत. निरागस आहेत. पाटील यांनी पुढील काळात येणाऱ्या निवडणुकांची तयारी करावी, असा सल्ला राऊत यांनी पाटीला यांना दिला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर सातत्यानं टीका केली आहे. परिणामी राऊत यांनी त्यांना फक्त टीका करण्याचं काम उरल्याची टीका केली आहे.

दरम्यान, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून जोरदार वाद रंगला आहे. भाजपनं मुख्यमंत्र्यांवर राज्याबाबत गंभीर नसल्याची टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 “…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; प्रताप सरनाईक यांचं रोखठोक वक्तव्य

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता 

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग