पत्नीला ईडीची नोटीस मिळताच राऊतांची मोठी प्रतिक्रिया! गाण्याचे बोल लिहित थेट केलं आवाहन, म्हणाले…

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पीएमसी घोटाळा प्रकरणी नोटीस बजावली आहे.

पत्नीला मिळालेल्या ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांनी यासंदर्भात आपल्याला काहीही माहित नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता यानंतर संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून काही गाण्याच्या ओळी शेअर करत अप्रत्यक्षपणे थेट आवाहन केलं आहे.

संजय राऊत यांनी ट्वीटरवरून गाण्याच्या काही ओळी शेअर केल्या आहेत. ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया’, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या या ट्वीटवरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना नोटीस बजावण्यात आली होती. या वर्षाच्या शेवट म्हणजे 30 डिसेंबरला खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ईडीच्या नोटीसनंतर काल एका वृत्त वाहिनीला एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ईडीच्या नोटीसवर दुजोरा देताना एकनाथ खडसे म्हणाले की, होय मला ईडीची नोटीस मिळाली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले. ईडीची नोटीस आल्यानंतर मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत आहेत. लोक साहनभूती व्यक्त करत आहेत. लोकांना हे आवडत नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

तसेच लोकांना असं वाटत आहे की, हा माझ्यावर एक प्रकारचा अन्याय होत आहे. वारंवार चौकश्या होणं लोकांना आवडलेलं दिसत नाही. मात्र, काही निर्णय असतात त्या आधीन राहूनच काम करायचं असतं, असंही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर राज्यभरातून केंद्र सरकार विरोधात विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सीबीआय आणि ईडीला कोर्टात खेचण्याचा पवित्रा उचलला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘शिवसेनेनं आम्हाला सल्ला देवू नये’; अशोक चव्हाणांचा संजय राऊतांवर हल्लाबोल!

“देशात भाजपची तानाशाही सुरु आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं”

‘…मग ठाकरे सरकारविरुद्ध आंदोलन करा’; राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य!

स्वस्तात सोनं खरेदी करायचं आहे, तर मग हीच आहे सुवर्णसंधी! 28 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंतच आहे ‘ही’ योजना

‘केंद्रातील पथक चौकशीसाठी येतं, पाहणीसाठी नाही’; केंद्रीय पथकाविषयीच फडणवीसांचा मोठा खुलासा!