राऊतांच्या वक्तव्याने सर्व डॉक्टरांच्या मनोधैर्याचं खच्चीकरण झालं, राऊतांनी राजीनामा द्यावा; IMAचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं, असं वक्तव्य केलं होतं. राऊतांच्या या वक्तव्यावरून सध्या विरोधकांनीसुद्धा जोरदार टीकेचे बाण सोडले आहेत. अशातच राऊतांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेने पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

संजय राऊतांचं वक्तव्य हे नकारात्मक आणि अपमानजनक आहे. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे आम्ही डॉक्टर पूर्ण कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणे काम करु शकत नाही. सर्व डॉक्टराचं मनोधैर्याच खच्चीकरण झालं आहे. त्यामुळे राऊतांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत, तुम्हीही योग्य ती कारवाई करता ही अपेक्षा करत असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेने पत्रात म्हटलं आहे.

सध्या सर्व जग कोरोनाच्या संकटात असताना सर्व आरोग्य अधिकारी आपला स्वत: चा नाही तर आपल्या सर्व कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा परिस्थितीत सरकार आणि राजकारण्यांनी पाठीशी उभं रहायला हवं अशी अपेक्षा असल्याचं पत्रात नमूद केल आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता या पत्रामुळे राऊतांवर कारवाई करतात की नाही?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून पुन्हा गृहमंत्री अमित शहांना रूग्णालयात केलं दाखल

“खोट्या बातम्या पसरवणारे राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी चीनकडून पैसे घेतले आहेत”

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य राहिलेले सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन

पुन्हा एकदा ‘या’ जिल्ह्याला महापुरचा धोका; 104 गावांना सतर्कतेचा इशारा

वांग्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!