…म्हणून पुन्हा गृहमंत्री अमित शहांना रूग्णालयात केलं दाखल

नवी  दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमित शहां यांनी आत्ता 14 ऑगस्टला कोरोनावर मात केली होती.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना काल मध्यरात्री एम्समध्ये दाखल करण्यात आलं असून शहा आत्ता ‘एम्स’चे संचालक आर गुलेरिया यांच्या निगराणीखाली आहेत.

दोन ते चार दिवसांपासून अमित शहा यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत होता. गेल्या काही दिवसांमागे त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला होता. पोस्ट कोव्हिड केअरसाठी शहा यांना ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आलं असून ते रूग्णालयातून आपलं काम करत असल्याचं  ‘एम्स’ रुग्णालयाने सांगितलं आहे.

दरम्यान,अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली होती. अमित शहा यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर 14 ऑगस्टला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती शहांनी आपल्या ट्विटरवरून दिली होती.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य राहिलेले सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन

पुन्हा एकदा ‘या’ जिल्ह्याला महापुरचा धोका; 104 गावांना सतर्कतेचा इशारा

वांग्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

काय सांगता! कोबी एवढा लाभदायी आहे; सविस्तर वाचा

“तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय”