काँग्रेस राष्ट्रवादीपाठोपाठ आता राजू शेट्टींनाही मोठा धक्का; या नेत्याचा पक्षाला रामराम

मुंबई |  गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आमि राष्ट्रवादीला अनेक दिग्गज नेते रामराम ठोकत आहेत. लोकसभेच्या निकालापासून आणि विधानसभेच्या तोंडावर बऱ्याच जणांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत जाणं पसंत केलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे.

रविकांत तुपकर यांनी राजीनामा देऊन राजू शेट्टींना मोठा धक्का दिला आहे. आज शेट्टींना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतू आज मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं तुपकर यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तुपकर यांच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे.

तुपकर यांनी स्वाभिमानीचा राजीनामा देऊन कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहे? हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलं आहे.

महत्वाच्या बातम्या-