रविकांत तुपकरांच्या राजीनाम्यानंतर राजू शेट्टी म्हणतात…

मुंबई |  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. रविकांत तुपकर यांनी राजीनामा देऊन राजू शेट्टींना मोठा धक्का दिला आहे. मात्र राजू शेट्टी यांनी कुठलीही टीका न करता उलट त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी चळवळीमध्ये आजपर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद. त्यांच्या भावी वाटचालीस स्वाभिमानी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा, असं ट्वीट राजू शेट्टी यांनी केलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनेक दिग्गज नेते रामराम ठोकत आहेत. त्यानंतर संबंधित पक्षाकडून सोडून जाणाऱ्या नेत्यावर टीकेची झोड उडालेली दिसून येते. मात्र राजू शेट्टींनी तुपकरांना पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतू आज मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असं तुपकर यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तुपकर यांच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. तुपकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत.

महत्वाच्या बातम्या-