मुंबई | सध्या बेकार असणाऱ्या आणि नोकरीची नितांत गरज असणाऱ्या तरुण आणि तरुणींसाठी भाभा अणुसंशोधन केंद्रात (Bhabha Atomic Research Center) नोकरीची संधी चालून आली आहे. बीएआरसीने (BARC) तांत्रिक अधिकारी आणि इतर रिक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत.
या ठिकाणी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली (Recruitment) असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (barc.gov.in) अर्ज करु शकतात.
या जागांसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. यावेळी 50 रिक्त जागांवर उमेदवार भरणे आहे. यात वैद्यकीय आणि वैज्ञानिक अधिकाऱ्यांच्या 15 आणि तांत्रिक 35 अशी भरती केली जाणार आहे.
या अर्जासाठी शूल्क 500 रुपये आकारण्यात येणार आहे. आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या संस्थेत विविध जागांसाठी उमेदवार भरण्याचे असून 56,100 ते 78,800 पर्यंत प्रतिमहा पात्रतेनुसार आणि नेमणुकीनुसार पगार मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत मोठी माहीती समोर
दसरा मेळाव्याबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले शिवाजी पार्क आणि…
फाल्गुनी पाठक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
2024 साठी भाजपेत्तर पक्षांच्या युतीवर शरद पवार म्हणाले; काँग्रेसला सोबत घेऊ नये…
दसरा मेळाव्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांचे मोठे वक्तव्य