“…तर महाराष्ट्रातील महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पूजा करील” – भास्कर जाधवांची मोठी टीका

मुंबई | रविवारी दापोली (Dapoli) येथे शिंदे गटाच्या आमदारांची एक सभा घेण्यात आली. या सभेला संबोधित करताना माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अनेकांवर टीका केली.

यावेळी रामदास कदमांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर टीका आणि भाष्य केले.

येत्या काळात मी चिपळून (Chiplun) आणि गुहागर (Guhagar) येथे सभा घेऊन भास्कर जाधवांची पळता भुई थोडी करणार आहे, असे रामदास कदम म्हणाले होते. त्यामुळे आता भास्कर जाधव देखील आक्रमक झाले आहेत.

रामदास कदमांना तातडीने वेड्यांच्या दवाखान्यात दाखल करा, नाहीतर हा माणूस काहीतरी अघटीत घडवेल, अशी खोचक शब्दांत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी टीका केली आहे.

रामदास कदमांची दापोलीतील सभा संपूर्ण राजकीय आणि वैचारीक बैठकींना छेद देणारी होती. यावेळी रामदास कदम यांनी जी भाषा वापरली, ती आजपर्यंत कोणीही वापरली नाही, असे जाधव म्हणाले.

रामदास कदमांनी वापरलेल्या भाषेचा विषय जस-जसा महाराष्ट्रात जाईल, तसतशी महाराष्ट्रातील जनता आणि विशेष महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पूजा करील, अशे भास्कर जाधव म्हणाले.

तसेच यावेळी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रामदास कदम यांना तात्काळ नेते पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. नाहीतर ते तुमची प्रतिमा देखील आगामी काळात मलीन करतील, असे भास्कर जाधव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

भाभा अणुसंशोधन केंद्रात मोठी भरती; 56100 ते 78800 प्रतिमहा पगारासाठी जागा रिक्त

मोठी बातमी: संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीबाबत मोठी माहीती समोर

दसरा मेळाव्याबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले शिवाजी पार्क आणि…

2024 साठी भाजपेत्तर पक्षांच्या युतीवर शरद पवार म्हणाले; काँग्रेसला सोबत घेऊ नये…

फाल्गुनी पाठक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल