“आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, राज्यात तिसरी लाट आली”

मुंबई | कोरोनारूग्ण (Corona) संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्यात लवकरच लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे. अशातच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता राज्य सरकारने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या वाढत्या प्रकरणांमुळे महाराष्ट्र सरकारचीही चिंता वाढली आहे.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून राज्य आता लॉकडाऊनच्या दारात उभे आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती आणखी बिघडू शकते, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तिसरी लाट आली आहे असं म्हणता येईल, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

राज्यात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी शाळा आणि मुंबई लोकलबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. वाढत्या केसेस पाहता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने गुरूवारी रात्री उशिरा नवी नियमावली जाहीर केली आहे.

लग्न समारंभ, अत्यंविधी यावर पुन्हा एकदा निर्बंध आले आहेत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात हे नवे निर्बंध लागू होणार आहेत.

दरम्यान, कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना आता सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर कोरोना नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सतीश सावंतांच्या पराभवानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर, ‘ती’ पहिली पोस्ट व्हायरल

‘धरणमूत्र पवार ओकून गेले,अख्खी चिवसेना ओकत होती पण…’; निलेश राणेंचा हल्लाबोल

सिंधुदुर्गात नारायण राणेंचा सेनेला ‘दे धक्का’; सतीश सावंत पराभूत

‘मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नका’; संजय राऊतांचा राज्य सरकारला घरचा आहेर

ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला जेवण दिलं नाही म्हणून वेटर सोबत केलं धक्कादायक कृत्य