“संविधानाच्या प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष शब्द वगळा”

नवी दिल्ली |  संविधानाच्या प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द वगळण्यात यावा, कारण त्याची आपल्याला आवश्यकता आहे. धर्मनिरपेक्ष असल्याचा आपल्याला बोर्ड लावण्याची आवश्यकता नाही. तसेच संविधानाचे संस्थापकही याविरोधात होते, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख नेते व संयोजक नंदकुमार यांनी केला आहे.

आरएसएसच्या एका पदाधिकाऱ्याने लिहिलेल्या ‘बदलत्या काळातील हिंदूत्व’ या पुस्तकाच्या प्रकाशनात नंदकुमार आले होते. यावेळी संविधानात धर्मनिरपेक्ष या शब्दाची काहीही आवश्यकता नाही, त्यामुळे हा शब्द वगळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

धर्मनिरपेक्ष असण्याचा आम्हाला बोर्ड लावण्याची खरंच गरज आहे का?, हे पाहावं लागणार आहे. व्यवहार, कार्य आणि भूमिकेच्या माध्यमातून हे आम्हाला सिद्ध करावे लागणार आहे का?, असा सवाल नंदकुमार यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, संविधानात सुरुवातीला धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश करण्यात आला नव्हता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 42 वी घटना दुरुस्ती करत या शब्दाचा राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत समावेश केला होता.

महत्वाच्या बातम्या-