अर्णब गोस्वामी यांच्या अ.टकेनंतर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य! म्हणाले राज्यात पत्रकारितेला…

मुंबई| अलिबाग पोलिसांनी आज सकाळी लवकर रिपब्लिक टीव्हीचे  संपादक अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेतलं आहे. इंटेरिअर डिझाईनर अन्वय नाईक आ.त्मह.त्याप्रकरणी कलम 306 च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णब गोस्वामींला अ.टक केलं आहे. आता अर्णब गोस्वामी प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचा ठाकरे सरकारशी काहीही संबंध नाही, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई पोलिस कोणावर अन्याय करत नाहीत. कोणावर सूड उगवत नाहीत, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

अन्वय नाईक आ.त्मह.त्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल, असंही संजय राऊत म्हणाले. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कोणावरही सूडबुद्धीने किंवा बदलाच्या भावनेतून कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही राऊतांनी केला आहे.

अर्णव गोस्वामी यांना अ.टक म्हणजे पत्रकारितेसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी पत्रकारितेसाठी हा काळा दिवस नसल्याचं म्हटलं आहे.

राज्यात पत्रकार आणि पत्रकारिता अशा कुणालाही धोका नाही. आम्हीही पत्रकार आहोत. चुकीचं काही केलं नसेल तर जोरजोरात ओरडण्याची गरज लागत नाही, असा टोला राऊत यांनी गोस्वामींना लगावला आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालयानं एका सुनावणीदरम्यान संबंधित चॅनेलवर टिप्पणी केली होती. त्या दिवसालाही काळा दिवस म्हणणार का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. पत्रकाराने आपल्या मर्यादा पाळायला हव्या, असा सल्ला यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान, नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडीओच्या इंटेरिअर डिझाईनचे काम केले होते. या कामाचे जवळपास नाईक यांना अर्णब गोस्वामी यांच्याकडून 5 कोटी 40 लाख रुपये येणे होते. मात्र, वारंवार पैसे मागूनही अर्णब गोस्वामी नाईक यांचे पैसे देत नव्हते. यामुळे अन्वय नाईक प्रचंड मानसिक तणावाखाली गेले होते.

यानंतर 5 मे 2018 रोजी नाईक यांनी अलिबाग जवळील काविर गावात त्यांच्या राहत्या घरी आ.त्मह.त्या केली. नाईक यांच्यानंतर त्यांच्या आईने देखील आ.त्मह.त्या केली होती. मात्र, आ.त्मह.त्या करण्यापूर्वी नाईक यांनी एक पत्र लिहून ठेवलं होतं.

या पत्रात अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनी आपल्या कामाचे पैसे न दिल्यानं आपण आ.त्मह.त्या करत असल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी अन्वेय यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गोस्वामी यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात त.क्रार दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्लीच्या संघाने केलेल्या ‘या’ चुकीमुळे कोलकत्ता टीम आयपीएल बाहेर गेली!

चित्रपट सृष्टीला मोठा धक्का! ‘या’ बड्या अभिनेत्याचा ऐन तारुण्यात मृ.त्यू

सारा अली खानची ‘ती’ गोष्ट सलमानला आवडली तेव्हा साराला मिठी मारत सलमानने…

अत्यंत धक्कादायक!!! अर्णब गोस्वामीला अ.टक करण्यामागचं खरं कारण आलं समोर!

कंगणा राणावतला आणखी एक मोठा धक्का; मुंबई पोलिसात…