सावधान… आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध; काढता येणार फक्त 50 हजार रूपये!

मुंबई |  येस बँक आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे ऐस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दिवसाला बँकेतून फक्त 50 हजार रूपये काढता येणार आहे. आता यापुढे दिवसाला 50 हजारांचं लिमिट असणार आहे. सर्व प्रकारच्या खात्यांना ही 50 हजारांची मर्यादा असणार आहे.

आजच ऐस बँकेचे शेअर मार्केटमध्ये शेअर जवळपास 25 टक्क्यांनी वाढले होते. कारण स्टेट बँक ऑफ इंडिय़ा या बँकेचा वाटा खरेदी करेल, अशी चर्चा होती. मात्र अशी चर्चा चालू असतानाच रिझर्व्ह बँकेवर ऐस बँकेवर निर्बंध लादल्याची बातमी हाती आली आहे.

एकापाठोपाठ एका बँकेवर रिझर्व्ह बँक निर्बंध घातले आहे ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. येस बँक आर्थिक संकटात सापडली असल्याने रिझर्व्ह बँकेने तिच्यावर निर्बंध घातल्याची माहिती आहे.

सर्व प्रकारच्या खात्यांना 50 हजारांची मर्यादा असणार आहे तर दुसरीकडे बोर्ड ऑफ डायरेक्टरवर देखील रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे ही बँक धोक्यात असल्याचं अधोरेकित होत आहे. 2018 पासूनच NPA म्हणजेच थकित कर्ज वाढल्याने बँक धोक्यात आली होती. तेव्हापासूनच तिचा संपूर्ण कारभार हा मंदावलेला होता आणि आता या बँकेवर RBI चे अशा प्रकारचे जर निर्बंध येत असतील तर ही बँक खरोखर संकटात सापडली आहे, असं म्हणावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

-13 लाख 85 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 9 हजार कोटी रूपये; अजित पवारांची माहिती

-औरंगाबादच्या विमानतळाचं नामांतर म्हणजे पराक्रमी महाराजांना दिलेली मानवंदना- जयंत पाटील

-शौचालयाला शिवाजी महाराजांचं नाव नाही; संदीप देशपांडेंचा आरोप प्रसाद लाड यांनी खोडला

-…अन् अजित दोभालांनी पोलिसांना सांगितली जीवा महाला अन् शिवाजी महाराजांची गोष्ट!

-मुलीला पळवून नेण्याची भाषा करणारे आज विधानसभेत- उद्धव ठाकरे