कोरोनाचा पुन्हा उद्रेक! चीन सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; भारतासह जगावर परिणाम होणार

शांघाय | कोरोना महामारीनं अवघ्या जगामध्ये मोठी हानी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येनं सातत्यानं विक्रम मोडले होते. कोरोना पहिल्यांदा चीनमध्ये सापडला होता त्यानंतर जगभरात पसरला.

कोरोनाचे अनेक व्हेरियंट देखील पहायला मिळाले आहेत. ओमिक्राॅननं तर सर्वत्र धुमाकूळ घातला होता. अशातच आता पुन्हा चीनमध्ये कोरोना हातपाय पसरत असल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनातील महत्त्वाचं शहर असणारं शांघायमध्ये कोरोना रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. परिणामी अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोना पसरण्याची शक्यता असल्यानं  भारतात देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना नियमावलीचं पालन करण्यासाठी शांघाय शहरामध्ये सरकारकडून कठोर नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे. चीनमध्ये आढळलेला ओमिक्राॅनचा बीए 2 हा व्हेरियंट आहे.

चीन सरकारने शांघाय आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. याचा फटका भारतातील प्रवासी वाहतुकीला देखील होणार आहे.

चीनमध्ये कोरोना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रूग्णसंख्या 5 हजारांच्या पुढं गेली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत शांघाय टाॅवरला बंद करण्यात आलं आहे.

दरम्यान, चीनमध्ये कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत असल्यानं आशियातील काही देशांमध्ये देखील अनेक प्रकारचे नियम लावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

 मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

‘तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?’; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

  ‘काॅंग्रेस मूर्खांच्या नंदनवनात रमलीय’; ‘या’ काॅंग्रेस नेत्याचा हल्लाबोल

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर