सोनिया गांधी अॅक्शन मोडवर! ‘या’ 4 बड्या नेत्यांचे राजीनामे घेतले

नवी दिल्ली | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र, यंदा आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवत काँग्रेसचा सपाटून पराभव केला.

काँग्रेसच्या या लज्जास्पद कामगिरीवर आता काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याचं पहायला मिळतंय. काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याचं देखील मागील दोन दिवसांपासून दिसून येतंय.

अशातच आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी अॅक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळतंय. सोनिया गांधी यांनी पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडून राजीनामे मागितले आहेत.

सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत दिली आहे.

पाच राज्यांमधील निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून दररोज मॅरेथॉन बैठका घेतल्या आहेत. त्यानंतर हा निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाचही राज्यांमध्ये सपशेल अपयश मिळाल्यानंतर सोनिया गांधीची कडक पावलं आहेत. त्यामुळे आता काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Russia Ukraine War: कीववर बलाढ्य रशियाला विजय का मिळवता आला नाही?, समोर आली ‘ही’ महत्त्वाची 5 कारणं

“…तेव्हा दिल्लीतून सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले”, मोठा गौप्यस्फोट

 काळजी घ्या…! पुढील 3 दिवस अंगाची लाहीलाही होणार, राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

“…नंतर आमचा नाद करा”; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना खुलं आव्हान

  नवाब मलिकांना दिलासा नाहीच; मुंबई उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय