‘बाबरीच्या निकालानंतर वाईनची बॉटल घेतली आणि…’; रंजन गोगोई यांचा खुलासा

नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2019 ला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी (Ayodhya Verdict) निकाल देण्यात आला होता. त्याला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी हा निर्णय दिला होता.

अयोध्येचा निकाल देणार्‍या पाच न्यायाधीशांच्या खंठपीठात माजी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस अब्दुल नझीर यांचा समावेश होता. आता रंजन गोगोई यांनी एक महत्त्वाच्या खुलासा केलाय.

रंजन गोगोई (Former CJI Ranjan Gogoi) यांचे ‘जस्टिस फॉर द जज: अॅन ऑटोबायोग्राफी’ हे आत्मचरीत्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीशी जुळलेल्या अनेक घटनांबाबत खुलासा केला आहे.

2018 मध्ये चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी घेतलेली पत्रकार परिषद, त्यांच्यावर झालेले लैंगिक छळाचे आरोप, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय ते रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात (Ayodhya Verdict) दिलेला निकाल या सर्व प्रकरणांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

रामजन्मभूमीप्रकरणी निकाल दिल्यानंतर सरचिटणीसांनी अशोक चक्राच्या खाली न्यायालय क्रमांक एकच्या बाहेर न्यायाधीशांच्या गॅलरीत फोटो सेशन आयोजित केलं. संध्याकाळी मी न्यायामूर्तींना ताज मानसिंग हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो. आम्ही चायनीज फूड खाल्ले आणि आमची आवडती वाईन प्यायली. मी सर्वात मोठा असल्याने या पार्टीचे पैसे मी स्वतः दिले, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, रंजन गोगोई यांची जस्टिस फॉर द जज ही ऑटोबायोग्राफी सध्या चर्चा विषय बनली आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या लिखानामधून अनेक गोष्टी बाहेर येतील, अशी देखील शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मौका सभी को मिलता है…’; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा 

‘….हे आपले संस्कार आणि संस्कृती आहे’; जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन 

“CDS बिपीन रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली”

अन् शेवटही डिसेंबरमध्येच….; बिपीन रावत यांचं डिसेंबर कनेक्शन समोर 

‘…तर मृत्यूचं तांडव टळलं असतं’; लँडींगसाठी फक्त 90 सेकंद हवे होते, त्या 90 सेकंदात नेमकं काय घडलं?