मोठी बातमी! फोन टॅपिंग प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांचा तब्बल 60 दिवस फोन टॅप करण्यात आला होता तर एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांचा 67 दिवस फोन टॅप करण्यात आला होता.

या नेत्यांचे फोन समाजविघातक घटक नावाखाली टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं, सर्वांना अ‍ॅन्टी सोशल एलिमेंट्स सांगून, सर्व खोटं सांगत फोन टॅप करण्यात आले. कुणाला ड्रग्ज पेडलर, कुणाला गँगस्टर म्हटलं गेलं. आमच्यावर नजर ठेवली जात होती.

आमची प्रायव्हसी भंग झाली. एक पोलीस अधिकारी ज्यांच्याकडून निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा करतो. ते एका राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्याच्या प्रति प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी हे करत आहे, असंही ते म्हणालेत.

एकनाथ खडसे, मी स्वत:, नाना पटोले… आमचे फोन नंबर तेच आहेत. पण आमच्या नावासमोर जे नाव टाकली आहेत त्यात कुणी ड्रग्ज पेडलर, कुणी गुंडांची टोळी चालवत आहे अशा प्रकारची नावं टाकून फोन टॅप करण्याची परवानगी रश्मी शुक्ला यांनी मागितली होती, असं राऊत म्हणाले.

2019 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना आमच्यावर पाळत ठेवली जात होती. तेव्हाच्या अधिकारी रश्मी शुक्ला या केंद्राच्या सेवेत होत्या. भाजपचे नेते रश्मी शुक्ला सारख्यांना पाठबळ देत आहे ते अत्यंत चुकीचं आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

आयडिया, एअरटेल सगळ्यांची सुट्टी होणार?, जिओनं आणला धमाकेदार प्लॅन 

“भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही” 

“PoK आपल्या बापाचंय, भागवतांनी तिथे संघाची शाखा सुरू करावी” 

राज्यातील ‘या’ भागांना अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

“माझ्या सर्व मित्रांना माझ्यापेक्षा जास्त माझी आईच आवडते”