आयडिया, एअरटेल सगळ्यांची सुट्टी होणार?, जिओनं आणला धमाकेदार प्लॅन

मुंबई | जिओने ने फायबर यूजर्ससाठी नवीन प्लान लाँच केला आहे. कंपनीने Jio Fiber एंटरटेनमेंट बोनान्जा प्लानची घोषणा केली आहे. हा प्लान सध्याच्या व नवीन दोन्ही फायबर यूजर्ससाठी उपलब्ध होईल.

जिओ फायबरच्या नवीन प्लान्सची (JioFiber Entertainment Bonaza broadband plans) सुरुवाती किंमत 399 रुपये आहे.

कंपनी यात ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो. यामध्ये यूजर्सला तब्बल 14 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे.

कंपनीनुसार, या प्लानमध्ये यूजर्सला Disney+ Hotstar, Zee5, Sony liv, Voot, Sunnxt, Discovery+, Hoichoi, Alt balaji, Eros Now, Lionsgate, Shemaroo Me, Universal+, Voot Kids, Jio Cinema सह 14 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. या सर्व एंटरटेनमेंट अ‍ॅप्सला यूजर्स छोट्या व मोठ्या दोन्ही स्क्रीनवर वापरू शकतील.

399 रुपयांच्या प्लान्समध्ये यूजर्सला 30 एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरता येईल. तसेच, 100 रुपये अतिरिक्त दिल्यास 6 अ‍ॅप्स आणि 200 रुपये जास्त दिल्यास 100 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस मिळेल.

या लिस्टमधील सर्वात महागडा प्लान 3,999 रुपयांचा आहे. यामध्ये 1000 एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट आणि 14 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. हा प्लान घेण्यासाठी यूजर्सला My Jio अ‍ॅपवर जावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

“भाजपची लावारीस कार्टी धमक्या देण्याशिवाय काही करू शकत नाही” 

“PoK आपल्या बापाचंय, भागवतांनी तिथे संघाची शाखा सुरू करावी” 

राज्यातील ‘या’ भागांना अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

“माझ्या सर्व मित्रांना माझ्यापेक्षा जास्त माझी आईच आवडते” 

“…आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे”