Top news देश

सेक्स रॅकेटमध्ये अटक झालेल्या थायलंडच्या तरूणींचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या, ‘जेंडर चेन्ज करून’

sex racket e1609209487549

लखनऊ | मध्य प्रदेशच्या इंदुरममध्ये(Indore) पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या देह व्यापाराचा (Sex Racket) पर्दाफाश केला. संबंधित सर्व आरोपींची चौकशी केली असता धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

सेक्स रॅकेटमध्ये अटक करण्यात आलेल्या थायलंडच्या चारही तरुणी आधी पुरुष होत्या. त्यांचं लिंग परिवर्तन करून (changed gender to become sex worker) त्यांना भारतात आणलं होतं.

भारतात आल्यानंतर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत होता.  पोलिसांनी सांगितलं की, एटम स्पा सेंटरमधून 10 तरूणी आणि 8 तरूणांना अटक करण्यात आली होती. ज्यातील 7 तरूणी थायलॅंडच्या होत्या.

यातील चार तरूणींनी त्यांचा जेंडर चेन्ज (Gender Change) केलं होतं आणि पासपोर्टवर त्यांचं जेंडर मेल म्हणजेच पुरूष आहे. इतर तीन पासपोर्टची माहिती घेतली जात आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, मसाज पार्लरमधून अटक करण्यात आलेल्या दोन मुलींना यापूर्वीही देखील अटक करण्यात आली होती. तसेच स्पा सेंटरचा व्यवस्थापक संजय वर्माला देखील यापूर्वी अटक करण्यात आली होती.

अटक केलेल्या थायलंडच्या तरुणींनी सांगितलं की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा सेक्स रॅकेटमध्ये अटक केलं होतं. तेव्हा कायदेशीर कारवाईसाठी त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले होते. तसेच खटला निकाली लागेपर्यंत देश सोडून जाऊ शकत नाही, या अटीवर त्यांना जामीन दिला होता.

जामीन मिळाल्यानंतर अशा स्थितीत भारतात जीवन जगणं आव्हानात्मक होतं. कारण पासपोर्टशिवाय ते आपल्या देशात जाऊ शकत नव्हत्या. त्यामुळे वेश्याव्यवसाय करण्यावाचून त्यांच्याकडे अन्य पर्याय नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.

6 जानेवारी रोजी सायंकाळी गुन्हे शाखा आणि महिला पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई करत विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शगुन आर्केडमध्ये सुरू असलेल्या स्पा पार्लरवर छापा टाकला होता. यावेळी घटनास्थळावरून 18 जणांना अटक केली होती, अशी माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण -एकनाथ खडसे 

आपल्याला लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचं नाही- उद्धव ठाकरे

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता इतक्या जणांच्या उपस्थितीत उरकावं लागणार लग्न

पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा काय सुरू, काय बंद?