…म्हणून गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण -एकनाथ खडसे

जळगाव | एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशापासूनच त्यांच्यात व भाजप नेत्यांमध्ये वाद रंगलेले पाहायला मिळाले आहे. एकनाथ खडसे विरूद्ध भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील राजकीय संघर्ष संपण्याचं नाव घेत नाहीये.

गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचे समजताच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनी आक्रमक शब्दात निशाणा साधला आहे.

भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गिरीश महाजनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, अशी माहिती खडसेंनी दिली.

गिरीश महाजनांना मोक्का कारवाईच्या भीतीनेच तर कोरोनाची लागण झाली नाही ना?,अशी खोचक टीका एकनाथ खडसेंनी केली आहे.

गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भीतीने तर महाजनांना कोरोना झाला नाही ना?, अशी शंका उपस्थित करत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना टोला लगावला आहे.

काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी ईडीची चौकशी लागली म्हणून एकनाथ खडसेंना दुसऱ्यांदा कोरोना झाला, अशी टीका गिरीश महाजनांनी केली होती.

मला त्यावेळी खरंच कोरोना झाला होता. आताही गिरीश महाजनांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. मला तर संशय आहे मोक्का कारवाईच्या भीतीनेच महाजनांना कोरोना झाला, असं टीकास्त्र खडसेंनी सोडलं आहे.

माझी प्रार्थना आहे की गिरीश महाजन लवकर बरे व्हावेत. त्यांची समाजाला गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे. त्यांची प्रकृती उत्तम राहावी, अशी मी प्रार्थना करणार असल्याचंही खडसे म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसात अनेक नेते, मंत्री यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या-

आपल्याला लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचं नाही- उद्धव ठाकरे

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता इतक्या जणांच्या उपस्थितीत उरकावं लागणार लग्न

पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा काय सुरू, काय बंद?

“सरकार बरखास्त करण्याची कारवाई झाली पाहिजे”