“सुशांत सिंहच्या खात्यातून गेल्या 90 दिवसात रियाने तब्बल इतके कोटी केले खर्च”

पाटणा | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येच्या तपासात आता नवनवीन माहित समोर येऊ लागली आहे. पोलीस करत असलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. मात्र सुशांतच्या वडिलांनी म्हणजेच के. के. सिंह यांनी रियाविरोधात तक्रार दाखल केल्याने या केसमध्ये नवीन ट्विस्ट आला आहे.

इतके दिवस म्हणजेच सुशांतने आत्महत्या केल्यावर त्याच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील काही कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक असल्याचं बोललं जात होतं मात्र के. के. सिहं यांनी सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया विरोधात तक्रार दाखल करत तिच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. मात्र बिहार पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की 90 दिवसात रियाने सुशांतच्या खात्यातून मोठी रक्कम काढली आहे.

बिहार पोलिसांनी रियाच्या बँक अकाऊंटची माहिती काढली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार रियाने गेल्या 90 दिवसांत सुशांतच्या अकाऊंटमधून तब्बल तीन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली आहे.

दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे रियाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती बिहार पोलिसांनी मिळवली आहे. त्यामुळे आता संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली रिया कोर्टात गेली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“अमित भाई, लवकरात लवकर बरे होऊन कोरोनाच्या या काळात आम्हाला मार्गदर्शन करावं”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामायणातील मंथरेसारखे; हनुमान गढी महंतांची टीका

गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण; राहुल गांधी म्हणाले…

कौतूकास्पद! सेक्स वर्कर्सच्या मुलांसाठी गौतम गंभीरने उचललं मोठं पाऊल!

बिहारच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याच राजकीय षडयंत्र- जितेंद्र आव्हाड