टाटांच्या गाड्या कुणाला परवडणार?, किमतीबाबत सर्वात मोठे बदल जाहीर

नवी दिल्ली | कोरोना काळानंतर आता हळहळू विविध क्षेत्रात प्रगती व्हायला लागली आहे. गेल्या दीड वर्षात भारतीय वाहन क्षेत्राला (Automobile Sector) कोरोनाचा मोठा फटका बसला होता पण आता वाहन क्षेत्र सावरत आहे.

भारतीय वाहन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मारूती सुझुकीनं (Maruti Suzuki) आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता इतर कंपन्याही किंमती वाढवत आहेत.

भारतीय वाहन क्षेत्रातील ग्राहकांच्या पसंतीची आणि प्रसिद्ध कंपनी टाटा मोटर्सनं आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी यामुळं ग्राहकांना फटका निश्चित बसणार आहे.

टाटा कंपनीनं (Tata Motars) आपल्या वेगवेगळ्या माॅडेलच्या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. सरासरी 0.9 टक्के वाढ करण्याचा निर्णय कंपनीनं जाहीर केला आहे. या किंमती गाड्यांच्या माॅडेलनूसार वाढतील.

वाढलेल्या किंमती या 19 जानेवारी पासून लागू करण्यात आल्या आहेत. त्यापूर्वी म्हणजेच 18 जानेवारी पर्यंत नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना पहिल्या किंमतीतच गाडी मिळणार आहे.

वाढत्या महागाईचा परिणामी आता वाहन क्षेत्रावर पण व्हायला लागला आहे. परिणामी या महागाईची भरपाई म्हणून मोठ्या प्रमाणात कंपनी खर्च उचलणार आहे तर खुप कमी प्रमाणात याचा भार ग्राहकांवर टाकला जाणार आहे.

टाटा कंपनीनं किंमती वाढवण्याची घोषणा केली असली तरी ग्राहकांच्या सुचनांच्या आधारावर काही स्पेशल फिचरच्या गाड्यांच्या किंमती 10 हजार रूपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मारूती सुझुकी कंपनीनं आपल्या गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ केली होती.  0.1 टक्क्यांपासून ते 4.3 टक्के इतकी वाढ मारूती कंपनीनं केली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

 किरण मानेंना मिळाला नवा चित्रपट, म्हणाले “पहिलं शेड्यूल संपलं आता…”

“गृहमंत्री अमित शहा आणि लष्करप्रमुख मनोज नरवणेंना अटक करा”

‘…अशा नामर्द माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे’; चित्रा वाघ संतापल्या 

संतापजनक! गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून मारहाण, पाहा व्हिडीओ  

“देवेंद्र फडणवीस यांची अवस्था कुणी खुर्ची देता का खुर्ची अशी”