सुशांतपूर्वी रिया… ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव समोर आल्यानं मोठी खळबळ!

मुंबई| अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देशात खळबळ घातली होती. सुशांत प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये पडद्याआड घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणातत अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तुरूंगवास देखील झाला. या सर्व प्रकरणामुळे ती बॉलिवूड विश्वात चर्चेचा विषय ठरली होती. आता नुकतीच रिया आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय बनली आहे.

सुशांतच्या निधनानंतर रिया सोशल मीडियापासूनही लांबच होती, मात्र आता हळूहळू रिया नव्याने सुरुवात करताना दिसतेय. सोशल मीडियावरही ती ब-यापैकी सक्रिय झाली आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आणि ड्रग्स प्रकरणात रियाचे नाव समोर आल्यानंतर आता तिचे आयुष्य पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच सुशांतची मैत्रीण स्मिता पारिख हिनं आणखी एक आरोप रियावर केला आहे.

स्मिता पारिख ही एक दिग्दर्शक असून ती सुशांतची एक चांगली मैत्रीण होती. तिनं अनेक प्रायोगिक नाटकांमध्येही काम केलं आहे. एका शॉर्ट फिल्मच्या निमित्तानं सुशांतसोबत तिची मैत्री झाली होती. तिनं सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच एक ट्विट केलं आहे.

सुशांतची मैत्रीण स्मिता पारिख हिनं सुशांतपूर्वी रिया एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला डेट करत असल्याचं एक ट्विट सोशल मीडियावर केलं आहे. हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

“सुशांतपूर्वी ती आदित्य रॉय कपूरला डेट करत होती. असं वाटतंय हा एक प्रकारचा सेटअप होता. आदित्यकडून मिळणारा फायदा थांबताच तिनं सुशांतला डेट करण्यास सुरुवात केली. यासाठी तिला एक अतृप्त आत्मा देखील मदत करतो.” अशा आशयाचं ट्विट स्मितानं केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सुशांतच्या निधनानंतर आता रिया ‘चेहरे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमधून रियाला दूर ठेवण्यात आले होते. मात्र, रिया या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली होती. तिला मोठ्या पडद्यावर पाहून रियाचे चाहते देखील उत्साही झाले आहेत.

दरम्यान, सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर अनेक गंभीर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली. सीबीआयकडून प्रकरणाचा तपास होत असताना यात ड्रग्ज अँगल समोर आला आणि रिया या सगळ्यात अधिक अडकत गेली.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्मह.त्येनंतर रिया चक्रवर्ती कधी नव्हे इतकी चर्चेत आली होती. त्याच्या निधनानंतर तब्बल सहा महिन्यानंतर रिया महिला दिनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झालेली पहायला मिळाली होती. प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. रियाच्या पोस्टवर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या. काहींनी तिला ट्रोल केले. पण काही मात्र रियाची माफी मागताना दिसले.

 

महत्वाच्या बातम्या – 

आर्चीनं ‘या’ गाण्यावर केला बिनाधास्त डान्स; पाहा…

‘ये लाल इश्क, ये मलाल इश्क!’ ‘या’…

‘धर्म म्हणजे काय मला शिकवू नका’;…

सोन्याच्या दरात तेजी कायम, वाचा आजचा दर

…अन् म्हशीने सिंहाला शिंगावर उचलून आदळलं; पाहा जबरदस्त व्हिडीओ