प्रेरणादायी! तरूणाने केलं असं काही की, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली |  आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यात लहान मुला-मुलींचे व्हिडीओही आपल्या पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. असं म्हणतात मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आपण कोणतीही गोष्ट मिळवू शकतो. असाच एक प्रेरणा देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक अपंग तरूण स्टन्ट करताना दिसत आहे. हवेत उडी मारून कोलांटी उडी मारत आहे. हा व्हिडीओ सर्वांसाठी एक प्रेरणा ठरत आहे. या व्हिडीओमधील स्टंट करणाऱ्या तरूणाचे नाव निखील असल्याचं समजत आहे. दिव्यांग असूनसुद्धा आपआपल्या क्षेत्रात जबरदस्त कामगिरी करणारे अनेकजण आहेत. अशातरितीने हार न मानता यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या निखिलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

निखिलला एक पाय नसल्यामुळे त्याला अनेक अडचणी येतात. मात्र आपल्या अडचणींचा उगाचीच बाऊ न करता दिव्यांगतेपेक्षा माझे स्वप्न कितीतरी मोठे असल्याचं तो सांगतो. निखिल जंम्पिंगमध्ये अगदीच तरबेज असून एका पायावर कुठल्याही आधाराविना तो लॉंग जम्प करू शकतो.

निखिलचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ मनु गुलाटी यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रंचड व्हायरल होत असून. त्याची जिद्द पाहून त्याचं कौतुक केलं जात आहे. निखिलला देशासाठी पॅराऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकायचे असल्याचंही त्यानी सांगितलं आहे.

मनु गुलाटी यांनी पोस्ट केलेला निखिलचा व्हिडीओ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून रिपोस्ट केला आहे. या तरूणाची जिद्द पाहून मेहनत करणाऱ्यांची कधी हार होत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये मुलांना मंच भेटत असून निखिल त्याचे स्वप्न नक्की पूर्ण करेल, असा विश्वासही अरविंद केजरीवाल यांनी  व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतपूर्वी रिया… ‘या’ प्रसिद्ध…

आर्चीनं ‘या’ गाण्यावर केला बिनाधास्त डान्स; पाहा…

‘धर्म म्हणजे काय मला शिकवू नका’;…

‘ये लाल इश्क, ये मलाल इश्क!’ ‘या’…

सोन्याच्या दरात तेजी कायम, वाचा आजचा दर