‘या’ कारणासाठी रियानं सोडलं होतं सुशांतचं घर; रियाच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा!

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे.  सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण सीबीआयच्या हाती सोपवलं असून सीबीआय अतिशय वेगाने आपला तपास करत आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच सुशांत प्रकरणी वादाच्या घेऱ्यात सापडली आहे.

गेल्या पाच दिवसापासून सीबीआय रियाची चौकशी करत आहे. अशातच आता रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी सुशांतची बहिण प्रियांका सिंह हिच्यावर आरोप केला आहे. माने-शिंदे म्हणाले की, रियानं ईडी आणि सीबीआयला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की 8 जून रोजी सुशांतला त्याची बहिण प्रियंका हिचा कॉल आला होता.

प्रियंकानं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सुशांतला काही औषधं घेण्यास सांगितलं होतं. यावेळी रियानं सुशांतला ती औषध घेण्यास विरोध केला कारण सुशांत अगोदरच डॉक्टरांनी दिलेली काही औषधं घेत होता. प्रियंकानं दिलेली औषधं रियानं घेवू दिली नाहीत म्हणून रिया आणि सुशांतमध्ये 8 जून रोजी वाद झाला होता, अशी माहिती माने-शिंदे यांनी दिली आहे.

तसेच या वादानंतर सुशांतनं रियाला घर सोडून जाण्यास सांगितलं. त्या दिवशी रियाचं थेरपी सेशन होतं त्यामुळे रिया त्याला म्हणाली की मला थेरपी सेशन करू दे तर सुशांत तिला म्हणाला तू तुझ्या घरी जाऊन सेशन कर, असंही माने शिंदे यांनी म्हटलं आहे.

यावेळी सुशांत रियाला म्हणाला होता की त्याची बहिण येत आहे तिचा फोन आला होता. त्यामुळे तू तुझ्या घरी जाच यानंतर रिया म्हणाली मी घरी जाते मात्र तू तुझ्या गोरेगावमध्ये राहणाऱ्या बहिणीला बोलाव मग मी जाते. पण नाईलाजाने यावेळी रियाला घर सोडावं लागल्याच माने शिंदे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सुशांत प्रकरणी सुरुवातीपासून रियावर सातत्याने आरोप केला जात आहे की रिया सुशांतला कंट्रोल करत होती. मात्र सुशांतला त्याच्या बहिणी पूर्णपणे कंट्रोल  करत होत्या, असा आरोप माने शिंदे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

सीबीआय समोर अखेर रियानं उलघडलं महेश भट्ट आणि तिच्या नात्याविषयीचं गूढ

“इतर स्टार्सप्रमाणे तुझंही करिअर संपवून टाकेन अशी धमकी सुशांतला दिली होती”

दारूप्रमाणे मंदिरातून महसुल मिळाला असता तर…; भाजपची ठाकरे सरकारवर गंभीर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुखर्जींचा आशिर्वाद घेतानाचा फोटो ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

प्रणव मुखर्जींच्या जाण्याने आपल्या राष्ट्राने एक रत्न गमावला- छत्रपती संभाजीराजे