रिया स्वतः ड्रग्ज घेऊन सुशांतलाही ड्रग्ज घेण्यासाठी प्रवृत्त करत होती?; अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकड सोपविला आहे. यानुसार सीबीआयनं आपला तपास सुरू केला आहे. सुशांत मृत्यूप्रकरणी अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. नुकतंच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यातील व्हाट्सअॅप चॅट समोर आलं होतं. या व्हाट्सअॅप चॅटमुळे रिया आणि महेश सीबीआयच्या रडारवर आले होते.

सीबीआयच्या हाती रियाच्या मोबाईल मधील आणखी काही व्हाट्सअॅप चॅट्स लागले आहेत. सीबीआयच्या हाती लागलेल्या चॅटींग्जमध्ये रिया अनेकांशी ड्रग्ज विषयी बोलताना आढळली आहे. यामुळे आता याप्रकरणी सीबीआय टीमला मनी लॉंड्रींगच्या व्यतरिक्त ड्रग डीलींगचाही संशय येऊ लागला आहे. सुशांतलाही ड्रग्ज सेवनासाठी रियाने प्रवृत्त केल्याचं बोललं जात आहे.

तसेच व्हाट्सअॅप चॅटमुळे रिया स्वतःही ड्रग घेत असल्याचं समोर आलं आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईडीला तपासादरम्यान रियाच्या मोबाईलमध्ये एका ड्रग्ज डीलरचा नंबर मिळाला होता. तसेच ईडीनं रियाचे व्हाट्सअॅप चॅट सीबीआयसोबत शेअर केले आहेत. या व्हाट्सअॅप चॅटमधून ड्रग्ज संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियावर ड्रगचं सेवन केल्याचा आणि व्यापार केल्याचा आरोप केला आहे.

रिया चक्रवर्ती एमडीएमए, हशीश आणि मारीजुना नावाच्या ड्रग घेत होती. तसेच रिया सुशांतला देखील ड्रग सेवन करण्यासाठी सूचना देत होती, असंही रियाच्या व्हाट्सअॅप चॅटमुळे समोर आलं आहे.

रिया ड्रग घेत असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर रियाच्या वकिलांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. रियाने तिच्या आयुष्यात केव्हाच  ड्रग्ज घेतले नाहीत. या गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी रिया केव्हाही आपली ब्लड टेस्ट करण्यासाठी तयार असल्याचं रियाच्या वकिलांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नेटकऱ्यांनी रियाला चांगलंच धारेवर धरलं आहे. सुशांतचे चाहते रियाच्या अटकेची मागणी करत आहेत. सध्या सीबीआय याप्रकरणी जोडलेला प्रत्येक धागा दोरा शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“कॉंग्रेस नेत्यांनी पत्राचा विषय संपवून पक्षासाठी संघटन स्तरावर जोमाने काम करावं”

धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

अजब चोरीची गजब गोष्ट! …म्हणून हा तरूण फक्त रिक्षावाल्यांचे मोबाईल चोरायचा; कारण वाचूल व्हाल हैराण

सुशांतचा मित्र संदीप सिंह विषयी धक्कादायक माहिती समोर!

‘कॉंग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष गांधी कुटुंबाबाहेरील होऊ शकतो’; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य