कोर्टानं स्वप्नभंग केलाय, आता तरी सुधरा रोहीत पवारांचा भाजपला सल्ला

मुंबई |  उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीविरोधात हायकोर्टात दाखल झालेली याचिका, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे.

राज्य कोरोनाशी लढत आहे आणि भाजपच्या नेत्यांना राजकारणाचं पडलं आहे. त्यासाठी कधी राज्यपालांना भेटतात, तर कधी कार्यकर्त्यांच्या आडून कोर्टात जातात, असं म्हणत रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय.

कोर्टाने स्वप्नभंग केल्याने आता तरी सुधरा, असा सल्ला रोहित पवार यांनी भाजपला दिला आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलंय.

दरम्यान, आज एकीकडे भाजपचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जनता अशी स्थिती आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-किम जोंग उनचा मरणाशी लढा सुरु, वाचा नेमकं काय झालंय!

-“महान संतांच्या हत्येत होरपळून ठाकरे सरकारची राखरांगोळी होईल”

-बेजबाबदार वागून स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका- अजित पवार

-गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- चंद्रकांत पाटील

-‘चीनने खरं काय ते सांगितल्यास…’; जर्मनीची चीनला विनंती