किम जोंग उनचा मरणाशी लढा सुरु, वाचा नेमकं काय झालंय!

प्योंगयांग | उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग-उन यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर कार्डीओवॅस्क्यलरमुळे उपचार सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती पण त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात आलं आहे.

किम जोंग उन यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. ते जास्त प्रमाणात धुम्रपान करत होते, तसंच त्यांना स्थुलतेचाही त्रास असल्याचं सांगण्यात आलंय. 11 एप्रिल रोजी किम जोंग उन हे अखेरचे सर्वांसमोर आले होते.

आपल्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते सहभागी झाले नव्हते यावरून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीच्या अनेक अफवांना उधाण आलं होतं. जर ते रुग्णालयात असतील तर यावरून ते 15 एप्रिलच्या कार्यक्रमात का सहभागी नव्हते याचं उत्तर मिळतं, असं मत उत्तर कोरियाच्या प्रकरणांचे जाणकार ब्रुस क्लिंगर यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-“महान संतांच्या हत्येत होरपळून ठाकरे सरकारची राखरांगोळी होईल”

-बेजबाबदार वागून स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका- अजित पवार

-गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- चंद्रकांत पाटील

-‘चीनने खरं काय ते सांगितल्यास…’; जर्मनीची चीनला विनंती

-कराडकरांची चिंता वाढली, आणखी दोन कोरोना पॉझिटीव्ह सापडले!