युवकांनो घराबाहेर पडून मिळेल ते काम स्वीकारा- रोहित पवार

मुंबई | आपण असेच घरात बसून राहिलो, तर या संकटाची उंची एवढी वाढेल की त्यावर मात करणंही आपल्याला कठीण होऊन बसेल. त्यामुळे युवकांनो आता आपल्या पालकांवर जबाबदारी टाकू नका, कोणतंही काम लहान-मोठं न समजता स्वीकारा, असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाऊन केल्याने गेली काही महिने आपण घरात आहोत. पण आता परिस्थिती बदलतेय व लॉक डाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणलीय. तरीही लोकांमध्ये अजून भीतीचं वातावरण आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

आज खासगी क्षेत्रांत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. हे आणखी किती काळ चालेल माहीत नाही. म्हणून कोणत्याही कामाला लहान-मोठं न समजता मिळेल तिथे कामाला सुरुवात करायला पाहिजे. पण आपण असेच घरात बसून राहिलो तर अडचणी वाढू शकतात, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

काहीजण सवडीने किंवा दोन महिन्यांनी किंवा कोरोना संपल्यावर जॉईन होऊ असं सांगतात. पण मला वाटतं कामाच्या बाबतीत जर आपण अशी कारणं देत बसलो तर ते आपल्याच नुकसानीचं होईल. म्हणून उलट कोरोनाच्या भितीला झुगारून देऊन काम करावं लागेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चीनकडून भारतीय सैन्याचंं कौतुक म्हणाले…’भारत या बाबतीत जगात अव्वल’

-सरकारने चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा फेरविचार करावा- नारायण राणे

-अरविंद बनसोड आणि काही दलितांवर अत्याचार झालेत, सरकारने न्याय द्यावा- संभाजीराजे

-ICICI व्हेंच्युअरतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत, उद्धव ठाकरेंनी मानले आभार

-पुढच्या निवडणुकीत 100 जागा पार करायच्या; पक्षाच्या वर्धापनदिनी निर्धार