व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांची मोदींवर जोरदार टीका

मुंबई | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतभेटीवर येत आहेत. त्यामुळे गुजरातमधील अहमदाबादमध्ये पाहूण्यांना झोपडपट्टी दिसू नये म्हणून भिंत बांधली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते आपल्याकडं आल्यावर त्यांना काही गोष्टी दिसू नये म्हणून आपल्याकडचे नेते भींत बांधतात, पण मला तसं करायचं नाही. उलट भिंतीचा अडसर दूर करून कर्जत-जामखेडमधील नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठेवा सर्वांपर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचीच ही झलक अवश्य पहा, असं म्हणत त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कर्जत जामखेडमधील पर्यटनाचे दर्शन घडवण्यात आले आहे. यामध्ये अभिनेते मिलिंद गुणाजी कर्जत जामखेडचे दर्शन घडवताना दिसत आहेत.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारीला भारतभेटीवर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. शिवाय अहमदाबादमध्ये ते भारतीयांना संबोधित करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“…तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी”

-…म्हणून शरद पवार घाबरत आहेत- देवेंद्र फडणवीस

-आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या, नरेंद्र दाभोळकरांच्या संस्कारात वाढलोय- सुप्रिया सुळे

-इंदुरीकर महाराजांना पाठिंबा देणारा ‘हा’ स्टेटस व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

शरद पवारांनी नाशिक दौरा रद्द करून उद्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक!